मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईतल्या शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषदेत घेत भाजपवर घणाघाती आरोप केले. महाआयटीत २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. ईडीच्या माध्यमातून भाजपने महाराष्ट्र सरकार पाडण्याचा डाव रचल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हम डरेंगे नही... झुकेंगे नही असं असं सांगत संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. यावर आता भाजप नेत्यांच्याही प्रतिक्रिया येत असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.


अमृता फडणवीस यांचं ट्विट
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत संजय राऊत यांना टोमणा मारला आहे. आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है... असं सूचक ट्विट केलं आहे. अमृता फडणवीस यांच्या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवेळी शिवसेना भवनाबाहेर वाघाचा फोटो असलेले पोस्टर्स लावण्यात आले होते. या पोस्टर्सवर झुकेगा नही असं लिहिण्यात आलं होतं. 



पण अमृता फडणवीस यांनी वाघ म्हणवणाऱ्या संजय राऊत यांना बिल्ली संबोधून शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे. आता अमृता फडणवीस यांच्या ट्विटला शिवसेना काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.