आता देवेंद्र फडणवीस त्यांची आवडती पुरणपोळी खात नाही तर... अमृता यांनी काय सांगितलं
देवेंद्र फडणवीस यांनी आता त्यांची आवडती पुरणपोळी खाणे बंद केल्याचे अमृता यांनी सांगितले.
योगेश खरे, झी मीडिया, मुंबई : पुरण पोळी हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची आवडती डिश. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनीच झी मराठी वाहिनीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात देवेंद्र यांच्या आवडत्या पदार्थाविषयी जाहीरपणे सांगितले होते. यामुळे देवेंद्र फडणवीस आणि पुरणपोळी दोन्ही चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची आवडती पुरणपोळी खाणं बंद केल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले आहे.
देवेंद्र 30 - 35 पुरणपोळ्या पातेलंभर तुपात बुडवून खातात
झी मराठी वाहिनीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आवडत्या पदार्थाविषयी सांगितले होते. देवेंद्र 30 - 35 पुरणपोळ्या पातेलंभर तुपात बुडवून खातात असं अमृता म्हणाल्या होत्या. या किस्स्यामुळे त्या ट्रोल देखील झाल्या होत्या. विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना जिथे जाईल तिथे खास पुरणपोळी खाण्याचा आग्रह केला जात असल्याचेही अमृता यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांची आवडती पुरणपोळी खाणे बंद केले
देवेंद्र फडणवीस यांनी आता त्यांची आवडती पुरणपोळी खाणे बंद केल्याचे अमृता यांनी सांगितले. देवेंद्र फडवीस आता मोदक खातात, डार्क चॉकलेट खातात असं अमृता फडणवीस यांनी सांगितले. आता देवेंद्र यांना कुणी पुरणपोळी खाण्याचा आग्रह करत नसावं असही अमृता यांनी गमतीच्या सुरात सांगितले. मुंबईतील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.