मुंबई :  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चांगलचं वातावरण तापलं आहे.  पत्रात परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पण अनिल देशमुख यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहे. तर आता या वादात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आमृता फडणवीस यांना उडी घेतली आहे. अमृता फडणवीस यांनी शायरी अंदाजात स्वतःचं मत ट्विटरच्या माध्यमातून मांडलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या म्हणाल्या, 'बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?' असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विट करत त्यांनी #SachinWaze #SachinVaze #Target100Cr असे हॅशटॅग देखील  दिले  आहेत. 


परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर केले आरोप
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटींची मागणी केली. असा गंभीर आरोप माजी पोलीसआयुक्त परमबीर सिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात केले आहे. परंतु आता अनिल देखमुख यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. 


अनिल देशमुख यांनी वाझे यांना वसूली करण्यास सांगितले...
परमबीर सिंग यांनी पत्रात म्हटलं आहे की, 'सचिन वाझे यांना अनिल देशमुख यांनी वसुली करण्यासाठी सांगितलं. वाझे यांनी या सर्व प्रकरणाची माहिती सिंह यांना दिली होती. मुंबईत 1 हजार 750 बार आहेत, तर प्रत्येक बार किंवा रेस्टोरेंट मधून दोन-तीन लाख घेतले तर 50 कोटी रूपये जमा होईल. बाकी इतर मार्गाने पैसे गोळा करू..' असं देखील या पत्रात लिहिलं आहे.