Amul Milk : महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामान्यांना आता आणखी एक फटका बसला आहे. तुमच्या घरी येणारं अमूलचं दूध (Amul Milk)  महागलं आहे. त्यामुळे गृहिणींचं बजेट पुन्हा एकदा कोलमडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातल्या काही शहरात अमूलच्या दूधदरात (Milk Price Hike) वाढ करण्यात आल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. प्रतिलीटर 2 रुपयांनी ही दरवाढ करण्यात आली आहे. 


उत्पादन आणि वितरण खर्च वाढल्याने दरवाढ करण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे. महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. उद्यापासून हे नवे दर लागू होणार आहेत. 


काय आहेत नवे दर


नव्या दरानुसार अमूल गोल्ड दुधाची किंमत आता अर्धा लीटर 31 रुपये इतकी असणार आहे. अमूल ताजा 25 रुपये तर अमूल शक्ती 28 रुपये अर्धालीटर असणार आहे. 


दुग्धजन्य पदार्थ महागणार
दुधाच्या किंमतीत वाढ झाल्याने दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. तूप, पनीर, लोणी, चीज, लस्सी, आईस्क्रीम आणि ताक यांचे भावही वाढतील. दुधाच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांच्या अर्थिक बजेटला आणखी एक झटका बसला आहे.