प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : गणेशोत्सवादरम्यान( Ganeshotsav) मुंबईतील प्रसिद्ध अशा चिंचपोकळीच्या(Chinchpokli) चिंतामणी मंडळाच्या(Chintamani Mandal ) मंडपात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला होता. चिंतामणी मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळच एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण झाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता मारहाण झालेल्या तरुणाचा शोध घेतला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंडपात घडलेल्या या मारहाणीच्या घटनेची राज्य मानवी हक्क आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. या मारहाणीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मारहाण झालेल्या तरुणाचा शोध सुरु करण्यात आला आहे. मारहाण करणा-यांवर कडक कारवाई होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. 


चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाजवळ एका व्यक्तीला मारहाण करणाऱ्यांचा पोलिस शोध घेतायेत. याप्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगानं सुमोटो दाखल केली. पोलिसांना निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आलेत. याप्रकरणी पोलिसांनी नंबर जाहिर करुन संबंधित मारहाण करणाऱ्या लोकांची ओळख पटवण्यासाठी आवाहन केले आहे.


गणेशोत्सव काळात मारहाण झालेला तो युवक कोण आणि मारणारे कोण याचा तपास काळाचौकी पोलीस करत आहेत. सदर घटनेतील मारहाण झालेला तरुण आणि त्याला मारहाण करणारे तरुण याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी काळाचौकी पोलीस ठाणे येथे काळवण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.