Anant Ambani Celebrates Employee Birthday: देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांचा जेव्हा चर्चा होते तेव्हा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) कुटुंबाचा उल्लेख झाला नाही असं होणार नाही. अंबानी कुटुंबात बारशापासून ते लग्नापर्यंत प्रत्येक कार्यक्रम अगदी राजेशाही थाटात साजरा होतो. श्रीमंतांच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या अंबानी कुटुंबाबद्दल सर्वसामान्यांमध्ये फार उत्सुकता आहे. यामुळे त्यांचं राहणीमान, नोकरांचे पगार, व्यवसाय, उत्पन्न याबद्दल लोकांन जाणून घ्यायला आवडतं. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच आता अनंत अंबानीचा (Anant Ambani) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनंत अंबानीने नुकताच आपल्या एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा केला. अनंत अंबानीने प्रायव्हेट जेटमध्ये केक कापत कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा केला. अनंत अंबानीने यावेळी आपल्या हाताने कर्मचाऱ्याला केक भरवला. आता आपले मालकच प्रायव्हेट जेटमध्ये वाढदिवस साजरा करत, हाताने केक भरवत असल्याने कर्मचाऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 


एकीकडे अनंत अंबानी कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करत असल्याने कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र व्हिडीओतील एक गोष्टीमुळे त्याला ट्रोलही केलं जात आहे. व्हिडीओत केक कापल्यानंतर कर्मचारी अनंत अंबानीच्या पाया पडताना दिसत आहे. कर्मचारी वयस्कर असल्याने त्याने अशाप्रकारे आपल्यापेक्षा वयाने कमी असणाऱ्या अनंत अंबानीच्या पाया पडणं अनेकांना रुचलेलं नाही. 



अनंत अंबानीने आपल्यापेक्षा वयाने इतक्या मोठ्या व्यक्तीला पाया पडण्यापासून थांबवायला हवं होतं अशी प्रतिक्रिया अनेक युजर्सनी दिली आहे. तर काहींनी मात्र जी व्यक्ती आपल्याला संकटात साथ देते, नोकरी देते त्याच्या पाया पडण्यात काही हरकत नाही असं म्हटलं आहे. 




अनंत अंबानी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा आहे. नुकतंच अनंत अंबानी आपल्या साखरपुड्यामुळे चर्चेत आला होता. अनंत अंबानीने एनकोर हेल्थकेअरचे संचालक वीरेन मर्चेंट यांची मुलगी राधिका मर्चंटशी साखरपुडा केला आहे. लवकरच दोघे विवाहबंधनात अडकरणार आहेत. दरम्यान साखरपुड्यात अनंत अंबानीचं वाढलेलं वजनही चर्चेचा विषय ठरला होता. अनंत अंबानीने काही वर्षांपूर्वी आपलं वजन कमी केलं होतं. पण पुन्हा एकदा त्याचं वजन वाढलं असल्याने त्याची चर्चा रंगली होती.