Anant Ambani : `अंबानी` आडनावाचं प्रेशर येतं का? आजोबांचा उल्लेख करत अनंत अंबानी पाहा काय म्हणाले?
Anant Ambani On family bonding : एका मुलाखतीत अनंत अंबानी यांनी भावा-बहिणीच्या बाँडिंगवर भाष्य केलं. त्याचबरोबर वडील मुकेश अंबानी यांच्याविषयी काय म्हणाले अनंत अंबानी? पाहा...
Anant Ambani Radhika Merchant Wedding : सध्या प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरात लगीनघाई सुरू आहे. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांच्या दोघांचा विवाह 12 जुलैला होणार आहे. त्यापूर्वी 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत आणि राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा रंगणार आहे. अशातच इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनंत अंबानी यांनी राधिका मर्चेंटशी होणाऱ्या लग्नाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यामुळे त्यांनी अनेक कौटुंबिक गोष्टीवर भाष्य केलं. मुलाखतीत त्यांना अंबानी आडनावाचं प्रेशर येतं का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं पाहा
काय म्हणाले अनंत अंबानी?
लोक तुम्हाला तुमच्या आजोबांसारखं मानतात, असं म्हटल्यावर अनंत अंबानी यांनी त्यावर भावूक उत्तर दिलं. लोकांची ही एक मोठी प्रशंसा आहे आणि आपण अद्याप त्या स्टारपर्यंत पोहोचलो आहोत असं मला वाटत नाही. मी फक्त आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत आणि त्यांचा मोठा वारसा सांभाळून देशसेवा करणं ही माझी जबाबदारी आहे, असं अनंत अंबानी यांनी म्हटलं आहे.
माझे वडील आम्हाला आजिबात स्ट्रिक्ट नाहीयेत. जसं एखादं पारंपारिक गुजराती कुटूंब असतं, तसंच आम्ही आमच्या वडिलांचा खूप आदर करतो. मी जे काही उभं केलंय, ते फक्त आणि फक्त त्यांच्या सपोर्टमुळे झालं आहे, असंही अनंत अंबानी यांनी म्हटलं आहे. माझा भाऊ आकाश अंबानी आणि बहिण ईशा अंबानी हे माझ्याआधी कॉलेजला गेले, त्यामुळे मला आई-वडिलांसोबत जास्त वेळ घालवता आला. खरंतर आमच्यात कोणतीच स्पर्धा नाही. ते दोघंही माझे मार्गदर्शक आहेत, असं अनंत अंबानी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मी नेहमी त्यांच्या सल्ल्याने पाऊल उचलतो. आमचं नातं एकदम फेविक्विक सारखं घट्ट आहे. माझा भाऊ माझ्यासाठी रामासारखा आहे, तर माझी बहिण माझ्यासाठी आईसारखी आहे. माझी ती नेहमी काळजी घेते. दोघंही नेहमी मला प्रोटेक्ट करत आले आहेत, असंही अनंत अंबानी यांनी म्हटलं आहे.