COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Anant Ambani Meets Uddhav Thackeray : आताची सर्वात मोठी बातमी...राज्यातील राजकारण एकीकडे ढवळून निघालं आहे. तरएकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) एकाच मंचावर दिसले. मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सवाचं शिंदे-फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे राज्यात नव्या महायुतीचे संकेत निर्माण झाले आहेत. तरदुसरीकडे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. (Anant Ambani meet Uddhav Thackeray at Matoshree nmp)


भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात


अनंत अंबानी आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली.. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. रात्री 8 वाजून 20 मिनिटानी अनंत अंबानींचा ताफा मातोश्रीवर दाखल झाले. रात्री 11.30 वाजताच्या सुमारास अंबानी मातोश्रीवरुन बाहेर पडले. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, देशातील एका बड्या उद्योगपतीचा मुलगा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आल्याने या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे.