Anant Ambani Radhika Merchant Wedding Rs 5000 Crore Spend: बीग बॉस ओटीटी 2 च्या अंतिम फेरीपर्यंत पोहचलेला सोशल मीडिया इन्फ्युएन्सर अभिषेक मलहान हा अनेक विषयांवर आपली स्फोटक मतं शेअर करत असतो. अनेकदा तो सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतो. नुकताच त्याने आपल्या एक्स अकाऊंटवरुन आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींच्या घरी झालेल्या विवाह सोहळ्याबद्दल स्फोटक मत शेअर केलं आहे. मागील आठवडाभरापासून मुंबईत पार पडत असलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मार्चंड यांच्या लग्न सोहळ्याची धामधुम सुरु आहे. परदेशी पाहुण्यांपासून जवळपास संपूर्ण बॉलिवूड या लग्नसोहळ्याला अवतरलं होतं. या लग्नसोहळ्यावर झालेल्या खर्चाचा आकडा समोर आल्यानंतर अभिषेक मलहान या खर्चावरुन नाराजी व्यक्त केली आहे. अंबानी कुटुंबाने मुलाच्या लग्नावर 5 हजार कोटी रुपये खर्च केल्याच्या मुद्द्यावरुन अभिषेक मलहानने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.


जाहिरातींवर पैसे खर्च करता असा आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिषेक मलहानने अंबानींना हे 5 हजार कोटी रुपये गंभीर आजारांनी ग्रासलेल्या लोकांवरील उपचारासाठी खर्च करता आले असते, असं म्हटलं आहे. अंबानी कुटुंब जाहिरातबाजीवर म्हणजेच पीआरवर फार मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतं असंही अभिषेक मलहान म्हणाला आहे. 


"हेच 5000 कोटी रुपये अंबानींनी..."


"5000 कोटींहून अधिक खर्च अंबानींनी लग्नावर केला आहे. असा विचार करा की एवढ्या मोठ्या प्रमाणातील पैसा वेगवेगळे गंभीर आजार असलेल्या लोकांच्या उपचारावर खर्च केला असता किंवा ज्यांना इलाज परवडत नाही त्यांच्या आरोग्यविषयक सेवांसाठी खर्च केला असता तर," अशी पोस्ट अभिषेक मलहानने केली आहे. हा एक केवळ विचार आहे, असं दर्शवणारा हॅशटॅगही त्याने वापरला आहे. 


"अनेकांना फरक कळत नाही..."


अन्य एका पोस्टमध्ये बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वातील फायनलिस्टने, "काही लोकांना घर खरेदी करणं आणि लग्नावरील जाहिरातबाजीसाठी पैसा खर्च करणं यामधील फरक काही लोकांना कळत नाही, हे फारच मजेदार आहे," असा टोला लगावला आहे. सध्या अभिषेक मलहानच्या या दोन्ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहेत. 



मार्चपासून सुरु होते लग्नासंदर्भातील कार्यक्रम; कुठे कुठे झाले हे कार्यक्रम?


दरम्यान, मार्च महिन्यापासून अनंत अबानी आणि राधिका मर्चंड यांच्या विवाहसंदर्भातील कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी पार पडले. गुजरातमधील जामनगरमध्ये मार्च महिन्यात सर्वात आधी प्री-वेडींगचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर इटली ते फ्रान्सदरम्यान समुद्रातील आलिशान क्रूझवर जून महिन्यामध्ये काही खास कार्यक्रम पार पडले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या मध्यापासून जवळपास आठवडाभर या विवाहातील वेगवेगळे कार्यक्रम टप्प्याटप्प्यात पार पडले. अंबानींच्या लग्नामधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये जागतिक स्तरावरील गायक जस्टीन बिबर, रिहाना, दिलजीत दोसांजबरोबरच अगदी दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून हिंदी मनोरंजनसृष्टीपर्यंत जवळपास सर्वच मोठे सेलिब्रिटी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. 12 जून रोजी राधिका आणि अनंत यांनी सप्तपदी घेतल्या. मात्र या लग्नाची संपूर्ण तयारी, सेलिब्रिटींना परफॉर्मन्ससाठी दिलेलं मानधन आणि एकंदरित तयारीच्या खर्चाची आकडेवारी नुकतीच समोर आली. एकूण संपत्ती 10 लाख 28 हजार 544 कोटी रुपये असलेल्या अंबानी कुटुंबाने धाटक्या लेकाच्या लग्नासाठी तब्बल 5 हजार कोटी रुपये खर्च केल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.