मुंबई : वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या लीगल टीमची बैठक सुरु आहे. उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरु आहे. धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? याबाबत अजून स्पष्ट झालेले नाही. अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांना चिन्ह मिळू नये यासाठी शिंदे गटाची रणनीती सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांनी चिन्ह वापरल्यास त्याला न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे चॅलेंज करण्याची शिंदे गटाची तयारी आहे. अंधेरी पोट निवडणुकीत कोणत्या चिन्हावर शिवसेना लढणार यावर प्रश्न चिन्ह आहे. उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.


केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनुवडणूक जाहीर केली आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke Death) यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.


निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 14 ऑक्टोबर 2022 रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. 3 नोव्हेंबरला मतदानप्रक्रिया पार पडणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.