मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri By Poll 2022) मोठा ट्विटस्ट आला आहे. या पोटनिवडणुकी महाविकास आघाडीकडून (Mahaviska Aghadi) ऋतुजा लटकेंऐवजी (Rutuja Latke) माजी महापौरांना उमेदवारी  मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऋतुजा लटके यांचा नोकरीचा राजीनामा अद्याप स्विकार न झाल्याने ठाकरे गटाने प्लॅन बी (Plan B) आखलाय. (andheri by poll 2022 shivsena may be give canidature to ex mayor vishwanath mahadeshwar if bmc not acepted rutuja latke resignation)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. ठाकरे गट राजीनामा मंजूर न झाल्यास माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. 


नक्की प्रकरण काय?


ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत क श्रेणी कर्मचारी असून त्या लिपीक पदावर कार्यरत आहेत. पोटनिवडणूक लढवण्यासाठी त्यांनी 3 सप्टेंबरला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर 1 महिन्यांनी त्या म्हणजेच 3 ऑक्टोबरला राजीनामा पत्र घ्यायला गेल्या. मात्र त्यावेळेस त्यांचा राजीनामा स्वीकारला नसल्याचं त्यांना समजलं, अशी माहिती विभागप्रमुख अनिल परब यांनी दिली. 


या राजीनामानाट्यामुळे मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा 14 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ऐनवेळेस जर राजीनामा मंजूर न झाल्यास गडबड होऊ नये म्हणून ठाकरे गटाने तयारी सुरु केलीय. 


ठाकरे गटाने लटकेंऐवजी महाडेश्वरांना मैदानात उतरवण्याची तयारी केलीय. त्यामुळे आता लटकेंचा राजीनामा मंजूर होतो की आणखी काही होतं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.