मुंबई : राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरून विविध मागण्यांसाठी मोर्चे काढले. मंगळवारी सकाळी ११ वाजलेपासून अंगणवाडी सेविका जिल्हाच्या ठिकाणी जमू लागल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यभरातून विवीध ठिकाणी निघालेल्या या मोर्चात अंगणवाडी सेविका, मदतनिस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या वेळी भाजीत भाजी अंबाडी  सरकार करतंय लबाडी, कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहात नाय..., अशा घोषणाही अंगणवाडी सेविकांनी दिल्या.


अंगणवाडी सेविकांच्या मागण्या


- शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी व अन्य लाभ मिळावेत.
- मानधनात वाढ करून ती १ एप्रिल २०१६ पासून लागू करावी.
- मानधन, प्रवास व बैठक भत्ता दर महिन्याला मिळावा.
- आहार अनुदान, इंधन भत्ता दर महिन्याला मिळावा.
- सादिलची रक्कम वाढवून ६ हजार रुपये करावी. (मोबाईलवरून डाटा, फोटो पाठवावे लागतात. यासाठी नेट पॅक मारावा लागतो म्हणून.)
- आवश्यक नोंदवह्या शासनाने पुरवाव्यात.
या प्रमुख मागण्यांसह अन्य १३ मागण्या अंगणवाडी सेविकांनी केल्या आहेत.