मुंबई : अमरावती हिंसाचारावरुन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहे. नवाब मलिक यांनी अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप ट्विटरवर शेअर केली असून बोंडे यांनी दंगलीचं समर्थन केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांनी ट्विटर अकाउंटवरुन ट्विटर स्पेसचा एक ऑडिओ शेअर केला आहे. "अमरावतीतील भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप ऐका...  झूठ बोले कौआ काटे...", अशा कॅप्शनसह ही ऑडिओ क्लिप शेअर केली आहे



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल बोंडे यांचं उत्तर
नबाब मलिकांनी केलेल्या आरोपांवर भाजप नेते अनिल बोंडे यांनी जोरादर उत्तर दिलं आहे. 'मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी मलिकांसारखा  कुठलाही हर्बल तंबाखू किंवा दारू पिऊन बोलत नाही, जिथे जिथे भाजपचं सरकार आहे तिथे दंगली घडत नाहीत. डाव्या आणि सेक्युलर विचाराच्या सरकारच्या राज्यात ह्या दंगली होतात. कारण ह्या दंगलीला प्रोत्साहन देण्याचं काम हे सरकार करीत असतं, असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.


गुजरातमधील गोध्रा हत्याकांड हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगल्या पध्दतीने हाताळलं होतं. त्यानंतर तिते एकही दंगल झाली नाही. फडणवीस सरकार यांच्या काळातही एकही दंगल झाली नाही. पण जिथे डाव्या विचारसरणीचे सत्ताधारी आहेत तिथे दंगल होत असल्याचं अनिल बोंडे म्हणाले, भाजप सरकार ने कधीच गुन्हेगारामची गय केली नाही असंही अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.


राज्याचे गृहमंत्री हतबल
सध्याचे राज्याचे गृहमंत्री हे हतबल झालेले आहे. ते हातपाय बांधलेले गृहमंत्री असुन प्रत्येक गोस्ट त्यांना विचारून करावी लागते. त्यामुळे त्यांचे गृहखात्यावर नियंत्रण नाही अशी टीकाही अनिल बोंडे यांनी केली आहे. 


संपूर्ण संचारबंदीची गरज नाही
सध्या अमरावतीत संचार बंदी लावण्यात आली आहे. पण संपूर्ण शहरात संचार बंदीची गरज नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेंतमाल कुठे विकावा अस सवाल अनिल बोंडे यांनी उपस्थित केला आहे.


पालकमंत्र्यांनी त्यांच्या गृहखात्याकडून तपास करावा
अमरावतीमधली दंगल ही पूर्वनियोजित कट असल्याचं मंत्री पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं होतं. त्यावर बोंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. जर पालकमंत्र्यांना  वाटत आहे ही दंगल पूर्वनियोजित आहे तर त्यांनी याची ग्रहखात्याकडून चौकशी करावी, अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली आहे.