Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख Arthur Road jail अचानक चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात पुढील उपचारासाठी आणण्यात आलं आहे. त्यांचा बी.पी. वाढला आहे. तसंच ई.सी.जी. Abnormal आला असून तज्ज्ञ डॉक्टरांचा चम्मू त्यांची तपासणी करीत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी असाच त्रास होत असल्याने त्यांना सुरुवातीला जेजे रुग्णालयात व नंतर KEM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.


याआधी 17 ऑगस्टला अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीनअर्जावर मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्यावतीने युक्तीवाद करण्यात येणार होता. मात्र अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल यांची तब्येत खराब असल्याने याचिकेवरची सुनावणी तहकूब करण्यात आली. आता या याचिकेवरची सुनावणी 29 ऑगस्टला होणार आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अिल देशमुख यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. 


काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी निलंबीत एपीआय सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यानी केला होता. यासंदर्भातलं एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवलं होतं. 


याप्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून सचिन वाझेला अटक करण्यात आली आहे. तसंच अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही अटक करण्यात आली आहे.