अनिल देशमुख आज अखेर ईडीच्या कार्यालयात दाखल
माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झालेत
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झालेत. गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख आणि कुटुंबीय गायब होते. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी चार ते पाच वेळा धाडी टाकण्यात आल्या होत्या, मात्र तरीही देशमुख ईडीसमोर हजर राहिले नव्हते.
त्यांच्या नागपूर, मुंबई आणि वर्ध्यातील घरी ईडीने छापेमारी करत कारवाई केली होती. त्यांना अनेकदा समन्स बजावले होते, परंतू ते ईडीसमोर हजर न राहता वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करत होते. गेल्या पाच महिन्यांपासून विविध तपास यंत्रणा अनिल देशमुखांचा शोध घेत होत्या परंतु त्यांचा कोणताच शोध लागत नव्हता. मात्र आज अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.
परमबीर सिंहांनी खोटे आरोप केले, असा दावा अनिल देशमुखांनी केलाय. आपण ईडीसमोर हजर झालो आहोत, मात्र आरोप करणारे परमबीर सिंह कुठे आहेत, असा सवाल देशमुखांनी केलाय.,