अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकणी ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष कोर्टाने देशमुख यांना ही कोठडी सुनावली आहे.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकणी ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष कोर्टाने देशमुख यांना ही कोठडी सुनावली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी ईडीसमोर हजर झाले होते. त्यानंतर ईडीने 12 तास चौकशी करुन त्यांना अटक केली होती. तर आज त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
ऋषिकेश देशमुखांना ईडीचं समन्स
अनिल देशमुखनंतर मुंबईतील ईडी कार्यालयात ऋषिकेश देशमुख यांना गुरुवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ईडीचे अधिकारी ऋषिकेश देशमुख यांची कसून चौकशी करतील, अशी शक्यता होती. दरम्यान ऋषिकेश देशमुख गुरुवारी ईडीसमोर हजर झाले नाहीत. तर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.