Anil Parab : अनिल परब-किरीट सोमय्या संघर्ष पेटला, म्हाडाच्या कारवाईविरोधात शिवसैनिक आक्रमक
Anil Parab vs Kirit Somaiyya : उद्धव ठाकरे यांचा अनिल परब यांना फोन, म्हाडाच्या कारवाईसंदर्भात अनिल परब यांना फोन करुन घेतली माहिती.
Anil Parab vs Kirit Somaiya : शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते अनिल परब आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील संघर्ष आता पेटला आहे. अनिल परब (Anil Parab) यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आलं आहे. (Anil Parab Office) भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. वांद्रे पूर्व भागातील परब यांच्या ऑफिसवर ही कारवाई करण्यात आली. म्हाडाने कारवाई केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. (Maharashtra Political News in Marathi)
शिवसैनिकांचा राडा
शिवसैनिकांनी वांद्रे इथल्या म्हाडा ऑफिसच्या (MHADA Office) समोर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. काही शिवसैनिक म्हाडाच्या ऑफिसमध्ये घुसले आणि त्यांना कारवाई कोणत्या आधारावर केली असा जाब विचारला. शिवसैनिकांनी (Shiv Sainik) म्हाडा ऑफिसबाहेर ठिय्या मांडला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अनिल परब यांना फोन करुन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.
अनिल परब यांनी अवैधरित्या त्यांच कार्यालय बांधल असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. तशी तक्रारही किरीट सोमय्या यांनी म्हाडा कडे केली होती. त्यावर सोसायटीने म्हाडा आणि संबंधित विभागाकडे दाद मागितली, पण ती फेटाळल्यानंतर काल सोसायटीने हे कार्यालय स्वतः हुन तोडलं.
अनिल परब यांचा इशारा
अनिल परबांच्या ऑफिसचं तोडकाम केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांना इशारा दिला आहे. सोमय्या हे जागेची पाहणी करणारे कोण? सोमय्यांनी येऊन दाखवावं आम्ही त्यांचं स्वागत करू, असं आव्हान परबांनी दिलंय. ऑफिसची जागा ही सोसायटीची आहे, जागा अधिकृत करण्यासाठी सोसायटीने म्हाडाला अर्ज दिला होता. मात्र, सोमय्यांच्या दबावामुळे म्हाडाने ही कारवाई केली. बिल्डरची सुपारी घेऊन सोमय्यांनी माझी बदनामी सुरू केल्याचा आरोप परबा यांनी केला आहे.
'इमारत धारकांच्या इच्छेने ऑफिस'
माझा जन्म इथे झाला आहे. आपलं जनसंपर्क कार्यालय इथेच राहू द्या अस स्थानिक इमारत धारकांनी सांगितलं म्हणून ही जागा वापरात होतो असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. माझं अनधिकृत कार्यालय आहे असं भासवून किरीट सोमय्या यांनी तक्रार दिली. मी म्हाडाला आधीच सांगितलं होतं, मी जागा माझी नाही, ही जागा अधिकृत करा अशी मागणी म्हाडाकडे करण्यात आली होती. सोसायटीने स्वत:हून ती जागा रिकामी केली आहे, असं अनिल परब यांनी सांगितलं. माझी बदनामी करण्याची किरिट सोमय्या यांनी सुपारी घेतली आहे. सोसायटीच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, असं अनिल परब यांनी सांगितलं.
सोमय्या यांचा आरोप
तर अनिल परब यांचं कार्यालय हे अनधिकृतच असून, लोकायुक्तांच्या सुनावणीत झालेल्या निर्णयाचं पालन म्हाडाने केल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. मात्र, आता कारवाई झाल्यानंतर परबांना मराठी माणूस आठवलाय. भ्रष्टाचार केला तेव्हा मराठी माणूस का आठवला नाही ? असा सवाल उपस्थित केलाय. उर्वरित तोडकामही म्हाडा पूर्ण करणार असून, आता परबांचं रिसॉर्ट तुटणार असल्याचा दावा सोमय्यांनी केलाय. दरम्यान, वांद्रेत पाडकाम झालेल्या ठिकाणी पाहणी करण्यासाटी किरिट सोमय्या तिथे पोहोचले. पण पोलिसांनी बीकेसीजवळच त्यांची गाडी रोखली.