कपिल राऊत, झी मीडिया, येऊर, ठाणे : आजकाल औद्योगिकरणाच्या युगात माणुस  प्राण्यांच्या विश्वात शिरकाव करत आहे. जंगलाची तोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याचा परिणाम वन्य जीवांवर झाला आहे.  दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला प्राण्यांची गणना केली जाते.  ठाण्यातल्या येऊरच्या जंगलामध्ये बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना करण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वन्यजीवसृष्टीत वाढ झाल्याचं या प्राणी गणनेत दिसून आलं.


प्राणीगणनेमध्ये माकडांंचं प्रमाण सर्वाधिक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या ठाण्याच्या दिशेकडच्या येऊरच्या जंगलात, बुद्धपौर्णिमेच्या रात्री बारा ठिकाणी स्वयंसेवक आणि वनकर्मचाऱ्यांच्या मदतीनं पाणवठ्यांवर वन्यजीवांची नोंद करण्यात आली. या प्राणीगणनेत माकडांचं प्रमाण सर्वाधिक दिसून आलं. तसंच बिबटे, सांबर आणि इतरही प्राण्यांची नोंद झाली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी येऊर परिक्षेत्रामध्ये १६ ठिकाणी केलेल्या प्राणीगणनेत २०५ वन्यजीव आढळून आले होते. यंदा याच क्षेत्रात १२ ठिकाणी केलेल्या गणनेत २५० वन्यजीव दिसले. 


भविष्यात जंगलं वाचली तर प्राणी वाचणार आहेत त्यामुळे त्यासाठी आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे.