घरात सापडलेल्या अंड्यांतून ७२ दिवसांनंतर सापाच्या पिल्लांचा जन्म
सर्पतज्ञ राहुल मगर, सर्पमित्र स्वप्निल खटाळ, नीलेश निर्मळ यांनी घटनास्थळी येऊन सापाला पकडले.
मुंबई: डहाणू तालुक्यातील टंकारपाड़ा येथे एका घरात शिरलेल्या सापाला वाचवल्यानंतर त्याच्या अंडयातून जन्मलेल्या सात पिल्लांनाही सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे. एका व्यक्तीच्या घरात साप शिरल्याची माहीती फॉरेस्ट अँण्ड वाईल्डलाईफ कॉन्व्हर्सेशन अर्थात एफडब्यूसी संस्थेला मिळाली होती. यानंतर सर्पतज्ञ राहुल मगर, सर्पमित्र स्वप्निल खटाळ, नीलेश निर्मळ यांनी घटनास्थळी येऊन सापाला पकडले.
त्याला जंगलात सोडण्याआधी याच तस्कर जातीच्या सर्पाने सात अंडी दिली होती. हे लक्षात येताच त्यांनी ७२ दिवस त्या अंड्यांचे तापमान नियंत्रित ठेवून अनुकूल परिस्थिती निर्माण केली. आणि तब्बल ७२ दिवसांनी त्यातून जन्मलेल्या तस्कर जातीच्या सातही पिल्लांना जंगलात सोडून देण्यात आले.