मुंबई : महाविकासआघाडी सरकारच्या अडचणी वाढत आहेत. कारण आणखी एक समर्थक आमदार हा भाजपच्या गोटात जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अनेक आमदार हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. तर काही अपक्ष आमदार भाजपसोबत जात आहेत. त्यात आता आणखी एका नावाची भर पडत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार श्यामसुंदर शिंदे सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू आहे. शामसुंदर शिंदे हे राष्ट्रवादी समर्थक अपक्ष आमदार आहेत. पण उद्या ते भाजपला समर्थन देण्याची शक्यता आहे. राज्यात आता राजकीय हालचालींना जोरदार वेग आला आहे. गुवाहाटीपासून ते मुंबईपर्यंत सगळीकडेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची चर्चा आहे.


एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि ते संपूर्ण देशात चर्चेत आले. इतकंच नाही तर अनेक देशांमधून ही त्यांच्याबाबतची माहिती सर्च केली गेली. एक एक आमदारा राज्यात महत्त्व आलं आहे. अनेक आमदार हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत.


महाविकासआघाडीला आता अपक्षांकडून देखील धक्का बसण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडीतील अनेक समर्थक आमदार भाजपकडे वळत आहे. उद्या आणखी 2 आमदार शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे.


ठाकरे सरकारला आता बहुमत सिद्ध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे आता ते काय चमत्कार करतात का की खूर्ची सोडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.