मुंबई : कोरोनाचे संकट अर्ध्या मुंबई शहारावर आहे. कोरोना आता झोपडपट्टीत शिरल्याने आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण येणार आहे. धारावीत आणखी एक कोरोना रुग्ण सापडला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. धारावी मेन रोड इथे राहणाऱ्या एका ३५ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे येथील परिसर सिल करण्यात आला आहे. दरम्यान, या डॉक्टरच्या संर्पकात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 डॉक्टर कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते राहत असलेल्या इमारतीला सील करण्यात आले आहे . हा डॉक्टर मुंबई सेंट्रल इथल्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये सर्जन असल्याची माहिती मिळत आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णांनाही संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, सध्या त्यांच्यावर रहेजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


कोरोना अॅप, आरोग्य यंत्रणेला द्या माहिती


कोरोना  व्हायरसची लागण असलेली व्यक्ती जर तुमच्याजवळ आली तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमुळे समजू शकणार आहे. कोरोनाशी संदर्भात सरकारनं आरोग्य सेतू अॅप तयार केलंय. या अॅपमध्ये हिंदी, इंग्रजीसह अन्य ११ भाषा आहेत. या अॅपमध्ये सुरुवातील विचारलेल्या प्रश्नांनी माहिती भरायची आहे. त्यानंतर आर्टिफिशल इंटेलीजंटनुसार अॅप आपल्या आसपास कोणी कोरोना बाधित रुग्ण आला तर अलर्ट नोटीफिकेशन देतं.