मुंबई : मंत्रालयातील आणखी एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रालयातील प्रधान सचिवांना कोरोनाची लागण झाली आहे. परराज्यातील मजूर आणि राज्यात अडकलेल्या नागरिकांच्या व्यवस्थेसाठी मंत्रालयात स्थापन करण्यात आलेल्या सचिवांच्या विशेष गटात या अधिकाऱ्याचा समावेश होता. संबंधित अधिकाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर इतर त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या इतर सचिवांना क्वारंटाईन करण्यात आलंय. मंत्रालयात याआधी पाच जण कोरोनाबाधित झाले होते. आता मंत्रालयातील कोरोनाबाधितांचा आकडा सहावर पोहोचला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी कोरोनाचा शिरकाव सफाई कर्मचाऱ्याच्या माध्यमातून मंत्रालयात झाला होता. सफाई कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी चौघांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मंत्रालय निर्जुंक करण्यासाठी दोन दिवस बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर योग्य ती खबरदारी घेण्यात येत होती. मात्र, आज पुन्हा  मंत्रालयातील एका प्रधान सचिवांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येतआहे.


 परराज्यातील मजूर आणि राज्यात अडकलेल्या नागरिकांच्या व्यवस्थेसाठी मंत्रालयात स्थापन करण्यात आलेल्या सचिवांच्या विशेष गटात या अधिकाऱ्याचा समावेश होता. संबंधित अधिकाऱ्याचा रिपोर्ट  पॉझिटिव्ह आल्यानंतर इतर त्यांच्याबरोबर काम करणारे इतर सचिव क्वारंटाईन झाले आहेत. मंत्रालयात या आधी पाच जण कोरोना बाधित झाले होते, आता मंत्रालयातील बाधितांचा आकडा सहावर पोहोचला आहे.