अनुराग कश्यपची मोदी सरकारच्या `आत्मनिर्भर` संकल्पनेवर टीका
बहुतेक आता गँग ऑफ वासेपुरची कथा सापडेल
मुंबई : दिग्दर्शक, लेखक अनुराग कश्यप यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना आत्मनिर्भर बनण्याचा संदेश दिला. यावर अनुराग कश्यप यांनी ट्विट करून टीका केली आहे.
लॉकडाऊनमध्ये अनेक मजुर आपापल्या गावी निघून गेले आहेत. याकाळात अनेकांच्या जीवनात मोठे बदल झाले. लॉकडाऊन प्रत्येकाला काही ना काही शिकवून जाणारा आहे. अशा परिस्थितीत आपण सगळ्यांनीच 'आत्मनिर्भर' व्हायला हवं. हा संदेश मोदींनी आपल्या भाषणात दिला.
यावर अनुराग कश्यप यांनी ट्विटर कोळशाच्या क्षेत्रात कमर्शल मायनिंगला सुरूवात झाली. हे ट्विट भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील ट्विटला रिट्विट करता आता गँग ऑफ वासेपुर सिनेमाचा भाग ३ बनणार. याकरता त्यांनी भाजपचे आभार मानले आहेत.
अनुराग कश्यप यांच्या गँग ऑफ वासेपुर सिनेमाच्या दोन्ही भागांनी प्रेक्षकांच मन जिंकल आहे. यामुळे या ट्विटमध्ये सिनेमाचा उल्लेख केला आहे. सिनेमाला नवी कथा मिळाल्याचं यामधून त्यांनी व्यक्त केलं आहे.
रेल्वे मार्गावरच झोपल्याने पहाटे मालवाहू रेल्वे अंगावरून गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून दुःख व्यक्त केलं. यावर बॉलिवूडचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे.
अनुराग कश्यपने या ट्विटमध्ये म्हटलंय की,' हे काय पंतप्रधान आहेत? भाई. Assistance to Who? प्रेत उचलण्यासाठी? आणि काय रेल्वे रूळाच्या डाव्या बाजूला किती आणि उजव्या बाजूली किती ही परिस्थिती मॉनिटर करण्यासाठी?' अनुराग कश्यपच्या या ट्विटवर अनेक रिऍक्शन येत आहेत.