Sales Tax Case : Anushka Sharma च्या याचिकेनंतर कोर्टाची थेट विक्रीकर विभागाला नोटीस; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Anushka Sharma Sale Tax Case : अनुष्का शर्माच्या याचिकेनंतर मुंबई हायकोर्टाने विक्रीकर विभागाला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत
Anushka Sharma Sale Tax Case : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या याचिकेनंतर एका प्रकरणात मुंबई हायकोर्टाने थेट विक्रीकर विभागालाच नोटीस पाठवली आहे. मुंबई हायकोर्टाच्या (Bombay High Court) माध्यमातून अनुष्का शर्माने (Anushka Sharma) विक्रीकर विभागाला (Sales Tax Department) कर वसुलीच्या प्रकरणात विक्रीकर विभागाच्या नोटिसीला आव्हान दिले आहे. या प्रकरणी आता 6 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. हायकोर्टाने विक्रीकर विभागाला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी कोर्टाने फटकारल्यानंतर अनुष्काच्या कर सल्लागाराने केलेली याचिका मागे घेतली होती. त्यानंतर अनुष्का शर्माने पुन्हा एकदा याचिका दाखल केल्यानंतर हायकोर्टाने विक्रीकर विभागाला नोटीस पाठवली आहे.
अनुष्का शर्माने 2012-13 आणि 2013-2014 या वर्षांच्या कर वसुलीसाठी विक्रीकर विभागाच्या नोटिसीला आव्हान दिले आहे. त्यानंतर गुरुवारी मुंबई हायकोर्टाने याचिका दाखल करत विक्रीकर विभागाला नोटीस पाठवली आहे.
काय आहे अभिनेत्री अनुष्का शर्माची याचिका?
वर्ष 2012-13 आणि 13-14 च्या कर वसुलीसाठी विक्रीकर विभागाने बजावलेल्या नोटीसीला आव्हान देताना अनुष्का शर्माने स्वतःच्या नावानं याचिका दाखल न केल्याने ती फेटाळण्यात आली होती. कोर्टाच्या आक्षेपानंतर याच मुद्यावर अनुष्कानं आपल्या करसल्लागारामार्फत केलेली याचिका मागे घेतली होती. त्यानंतर पुन्हा हायकोर्टानं दिलेल्या निर्देशांनुसार अनुष्कानं स्वत:च्या नावानं याचिका दाखल केली होती.