मुंबई : गेल्या आठवड्यात अभिनेत्री अनुष्का शर्मा रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या अरहान सिंह नावाच्या तरुणाला चांगलेच झापले होते. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने पत्नी अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तो जोरदार व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर अरहानने विराट कोहली आणि अनुष्का शर्माला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटने १६ जून रोजी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा कारमधून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या तरुणावर संतापताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडीओतील तरुण अरहान सिंहने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. यात त्याने विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा समाचार घेतला.



‘हे सर्व भयानक आहे. मी चुकून एक छोटा प्लास्टिकचा तुकडा गाडी चालवताना बाहेर फेकला. त्यावेळी शेजारुन जाणाऱ्या एका कारची काच खाली होते आणि अनुष्का शर्मा अशोभनीय माझ्यावर ओरडायला लागते. मी माझ्या चुकीबाबत माफी मागत आहे. परंतु अनुष्काने योग्य शब्दात मला समजावले असते तर ती छोटी नसती झाली. माझ्या अलिशान कारमधून चुकून जो कचरा बाहेर पडला तो तुझ्या (अनुष्का) मुखातून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यापेक्षा कमीच आहे. तसेच ज्याने (विराट) हा व्हिडीओ शूट करून पोस्ट केला त्याच्या डोक्यात यापेक्षा जास्त कचरा आहे’, असे अरहानने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलेय.