चांगली बातमी । आता महाराष्ट्र सरकारची हाफकिन संस्था करणार कोरोना लस उत्पादन
मुंबईसह राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाची वाढती संख्या चिंतेचा विषय होत आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. (Coronavirus in Maharashtra) कोरोनाची वाढती संख्या चिंतेचा विषय होत आहे. अधिकाधिक प्रमाणात लस उत्पादन होण्याची गरज लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी हाफकिन संस्थेला (Halfkin Institute) लस बनविण्याची परवागी द्यावी अशी मागणी केली होती. ही मागणी आता मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अधिक बळ मिळणार आहे.
हाफकिन संस्थेला (Halfkin Institute) भारत बायोटेककडून (Bharat Biotech) तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सिन (covacin) बनविण्यास मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून (Central Government's Department of Science and Technology) ही मान्यता दिली आहे. दरम्यान, आपल्या विनंतीचा स्वीकार करुन केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते. असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत.
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरुप यांनी काल मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली आहे. कोवॅक्सिन बनविण्यास एक वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन (Halfkin Biopharma Corporation) यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिनमध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी, असेही या पत्रात नमुद करण्यात आले आहे. यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी आणि वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना सांगितले.