मुंबई : भायकला येथील राणीच्या बागेतील पेंग्विनच्या संगोपनासाठी १२ कोटींच्या खर्चाच्या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी देण्यात आलीय. पुढच्या तीन वर्षांत हा देखभाल खर्च करण्यात येणार आहे. हा खर्च मुंबई महापालिकेच्या अंदाजपत्रकापेक्षा दोन कोटी रुपये जास्त आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे दिवसाला पेंग्विनवर एक लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे एका पेंग्विनचा आणि पेंग्विनच्या पिल्लाचा मृत्यू झाल्यानंतरही जुन्याच कंत्राटदाराला म्हणजे हायवे कन्स्ट्रक्शन या वादग्रस्त कंपनीला हे कंत्राट देण्यात आलंय. महापालिकेनं अंदाजित रकमेपेक्षा दोन कोटींची जास्त खिरापत या कंपनीला देऊ केली आहे.


नेमकी ही मेहरबानी कशासाठी असा प्रश्नही यानिमित्तानं उपस्थित होतोय. सध्या महापालिका खर्च करत असलेल्या १२  कोटींमध्ये पेंग्वीनच्या खाण्यासाठी येणारा खर्च तसंच पेंग्वीन कक्षाची वातानुकुलित यंत्रणा, विद्युत यंत्रणा, पेंग्विनची जीवरक्षक यंत्रणा, खाद्यपुरवठा इत्यादी खर्चाचा समावेश आहे.