मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. आर्यन खानची गुरूवारची रात्रही जेलमध्येच गेली. आर्यनसह 8 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यानं कालही त्याला जेलमध्येच मुक्काम करावा लागला. गुरूवाररी रात्री आठही आरोपी NCB कोठडीत होते मात्र NCBला आरोपींची चौकशी करायला मनाई करण्यात आली होती. दरम्यान एनसीबीच्या ताब्यात असलेल्या अरबाज मर्चेंटने न्यायालयाकडे मोठी मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरबाज मर्चंटने न्यायालयाकडे अपील केले आहे की ज्या क्रूझ शिपमधून त्याला अटक करण्यात आली त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जावे. अरबाजच्या या मागणीनंतर खरंच कोण आरोपी आहे? हे समोर येण्याची दाट शक्यता आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, अरबाज मर्चंटच्या वकिलाने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. 



यासोबतच आणखी एका याचिकेत क्रूझ शिपवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे अरबाज मर्चंटचे वडील असलम मर्चंट वकील आहे. अरबाजचे वडील आणि वकील असलम यांनी कायद्या विश्वास व्यक्त करत आर्यन आणि अरबाज लवकरचं या अडचणीतून बाहेर येतील असं देखील म्हणाले आहे. पण अद्याप आतापर्यंत अभिनेता शाहरूख खानची कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही.