Maharashtra Politics: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्यावर एका महिलेचे लैगिंक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. आता या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट आला आहे.  शेवाळे यांच्यावर झालेल्या आरोपावरुन राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जंपली आहे. राहुल शेवाळे प्रकरणात पीडितेचा चेहरा उघड केल्याप्रकरणी रूपाली ठोंबरे(Rupali Thombre) यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी हा इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या पीडित महिलेचा चेहरा फेसबुक लाईव्हद्वारे उघड केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर राज्य महिला आयोग कारवाई करणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यकर्त्या आहेत. दरम्यान, मी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही, त्यामुळं महिला आयोग कारवाई करू शकत नाही, असं प्रत्युत्तर रुपाली पाटलांनी दिले आहे.


खासदार राहुल शेवाळे आरोप प्रकरणातील पीडितेला संरक्षण देण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. महिला आयोगाने पोलीस महासंचालकांना वारंवार पत्र पाठवून देखील संबंधित पीडितेची साधी तक्रार देखील पोलीस ठाण्यामध्ये नोंदवून घेतली जात नाही ही बाब चिंताजनक असल्याचा चाकणकर यांनी म्हटल आहे.  ॉती महिला मुंबईत येईल आणि गुन्हा दाखल करेल, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केला आहे. राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या जीवाला धोका असल्याचा दावा रुपाली पाटील यांनी केला होता.  तसेच त्या महिलेला मुख्यमंत्र्यांनी संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली होती.


दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रूपाली पाटील यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून पीडित महिलेचा विषय जगासमोर आणला. मात्र, हे करताना त्यांनी तिची ओळख उघड केली. ही बाब देखील धक्कादायक असल्याचं रूपाली चाकणकर म्हणाल्या. या संदर्भातदेखील संबंधितांना पोलीस महासंचालकांच्या मार्फत पत्र पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती रूपाली चाकणकर यांनी पुण्यात दिली.


नेमकं काय आहे प्रकरण


शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी एका फॅशन डिझायनरचे शोषण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले. व्हायरल झालेल्या व्हिडिओत खासदार राहुल शेवाळे एका महिलेसोबत दिसत आहे, यावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. यानंतर राहुल शेवाळी यांनी पत्रराप परिषद घेत आपली भूमिका मांडली. फेक अकाऊंटच्या माध्यमातून महिलेने मला ब्लॅकमेल केल्याचा दावा करत राहुल शेवाळे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्यावर आरोप करणारी महिला दोन वेळा कराचीला जाऊन आली आहे. या महिलेचे दाऊद आणि पाकिस्तानशी संबध आहेत. पाकिस्तानी एजंटच्या मदतीने तिने फेक अकाऊंट सुरू केलं होतं. या महिलेची पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे असंही राहुल शेवाळे म्हणाले.