आर्यन खानच्या अडचणी वाढणार, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचा आरोप?
एएसजी अनिल सिंग यांनी न्यायालयात सांगितले की, संपूर्ण देश ड्रग्सची तस्करी आणि वापराबद्दल चिंतित आहे. हा समाजातील गंभीर गुन्हा आहे. पार्ट्या दिल्या जातात, मादक पदार्थांचे सेवन केले जाते आणि महाविद्यालयीन विद्यार्थीही यात सहभागी होतात.
मुंबई : क्रूज ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर बुधवारी सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि आर्यनसाठी हजर असलेले वकील यांच्यात बरीच वाद-विवाद झाले. आता या प्रकरणाची सुनावणी एका दिवसानंतर म्हणजेच गुरुवारी होईल.
विशेष सरकारी वकील ए एम चिमलकर आणि अद्वैत सेठना यांनी एनसीबीसाठी युक्तिवाद केला. त्याचवेळी आर्यनच्या वतीने वरिष्ठ वकील अमित देसाई आणि सतीश मानशिंदे न्यायालयात उपस्थित होते. या दरम्यान, आर्यनवर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग यांच्या वतीने 'आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलिंग'चा आरोप केला गेला.
अंमली पदार्थांची तस्करी गंभीर गुन्हा
सिंग यांनी न्यायालयाला सांगितले, "संपूर्ण देश ड्रग्जची तस्करी आणि वापराबद्दल चिंतित आहे. हा समाजातील गंभीर गुन्हा आहे. पार्ट्या दिल्या जातात, मादक पदार्थांचे सेवन केले जाते आणि महाविद्यालयीन विद्यार्थीही यात सहभागी होतात. याचा परिणाम केवळ आर्थिक बाबींवर होत नाही तर ड्रग्ज तस्करीमध्ये सामील असलेल्या टोळ्यांबद्दल आम्हाला चिंता आहे.
सिंह पुढे म्हणाले की, 'आर्यन खानला कोणी आमंत्रित केले यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. ते आमंत्रण कोठे आहे? त्यांचा तर्क असा आहे की कोणीतरी त्यांच्याबरोबर ड्रग्ज घेऊन जात होते. मी पंचनामा आणि व्हॉट्सअॅप चॅट्स देखील वाचणार आहे.
एएसजीने आर्यनच्या अटकेमागचा कट नाकारला आहे. ते म्हणाले की, 20 आरोपी आहेत आणि त्यापैकी काही अंमली पदार्थ विकणारे आहेत. आर्यन खान आणि मर्चंट यांच्यामध्ये संभाषणाचा पुरावा आहे.
असे चॅट आहेत ज्यामध्ये हार्ड ड्रग्सबाबत एका परदेशी नागरिकासोबत बोलणी होत होती. पंचनामानुसार खानकडे ड्रग्स नाही मिळाले. अरबाजकडे मिळाली होती.
सिंह म्हणाले, 'आमचा युक्तिवाद असा आहे की, आर्यन खानला त्याच्या घरी भेटलेल्या मर्चंटकडे ही ड्रग्ज सापडली. स्वतःच्या वक्तव्यात त्यांनी आर्यनसोबतच्या नात्याची बाब मान्य केली आहे. आर्यनला पण माहित होतं की, मर्चंटकडे ड्रग्ज आहेत.
अनिल सिंह कोर्टात म्हणाले की, 'माझ्या माहितीनुसार, इतर आरोपींच्या ताब्यात ड्रग्ज सापडले आहेत. व्हॉट्सअॅप चॅट्स आवश्यक आहेत कारण त्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज खरेदी करण्याविषयी बोलत आहेत. परदेशी नागरिकांबरोबर ड्रग्जची चर्चा आहे, जी मोठ्या प्रमाणात आहे. मला या ड्रग्जबाबत माहिती नाही पण माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ती हार्ड डग्ज आहेत. मी युक्तिवाद करतो की आम्ही आतापर्यंत 20 लोकांना अटक केली आहे आणि त्यापैकी 4 ड्रग तस्कर आहेत. अचित आणि शिवराज अमली पदार्थ तस्कर होते.