Ashish Shelar : जितेंद्र आव्हाड राजीनाम्याचा केवळ कांगावा करत आहेत - आशिष शेलार
Jitendra Awhad Resignation : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे केवळ राजीनाम्याचा कांगावा करत आहेत. (Maharashtra Politics), असा हल्लाबोल भाजपचे नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे.
Jitendra Awhad Resignation : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे केवळ राजीनाम्याचा कांगावा करत आहेत. (Maharashtra Politics) आव्हाडांचे हे वेडे चाळे आहेत. त्यांना निर्दोषत्व सिद्ध करता येत नाही म्हणून हा त्यांचा कांगावा सुरु आहे, असा हल्लाबोल भाजपचे नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. (Maharashtra political News) त्याचवेळी शेलार यांनी आव्हाड यांना थेट आव्हान दिले आहे. तुम्ही राजीनामा द्याच. आम्हीच तेथून निवडून येऊ, असे शेलार म्हणाले. (NCP MLA Jitendra Awhad Resignation)
जितेंद्र आव्हाड कमालीचे संतापलेत
विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर जितेंद्र आव्हाड कमालीचे संतापलेत. तक्रारदार महिलेनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. या पोलिसी अत्याचाराविरोधात आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी ट्वीटद्वारे म्हटलंय. 72 तासांत आपल्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल झालेत. त्यामुळे पोलिसी अत्याचाराविरोधात लढणार असल्याचं आव्हाड म्हणाले. यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. आशिष शेलार यांनी आव्हाड हे कांगावा करत अरत असल्याचे म्हटले आहे.(अधिक वाचा - आमदार जितेंद्र आव्हाड अडचणीत, महिलेने केला गंभीर आरोप)
गुन्हा दाखल होणे आणि राजीनामा याचा काय संबंध आहे. हे म्हणजे चर्चगेट गाडीत बसने आणि मुलुंड केव्हा येईल विचारणे, असे आहे. तुम्ही कायदेशीर लढा. तुम्हाला राजीनामा द्यायचा तर द्या, तीही आम्ही जागा जिंकू, असा दावा शेलार यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंब्रा पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत आंदोलन केलं. त्यामुळे याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झालीय. तसंच मुंब्रा बायपासवरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला. (अधिक वाचा - 72 तासांत दोन गुन्हे; जितेंद्र आव्हाड यांनी घेतला मोठा निर्णय, त्यांच्या ट्विटची चर्चा)
आदित्य ठाकरेंवर शेलार यांची टीका
काही लोकांचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबई पाहत आहे. काही झालं तरी केंद्राच्या नावाने गळे काढायचे. आता ते गळेखोर कुठे आहेत. मोदी सरकारणे मराठीत अभियांत्रिकी शिक्षण मराठीत होत आहे. अजून कोणीही अभिनंदन केलेले नाही. काहीही झालं तरी 'बाबा लगीन' बाबा लगीन', असे म्हणत शेलार यांनी ट्विट केले आहे. त्यांनी माजी मंत्री आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांना थेट सवाल केला आहे. मराठी शिक्षण आणि मराठी भाषा करता तसेच मराठी शिक्षणाची गैरसोय करणारे आदित्य ठाकरे कुठे आहेत.
भाजपच्या जागर यात्रेचे सहा कार्यक्रम पूर्ण झाले प्रतिसाद जोरात मिळत आहे. भारत जोडो यात्रेत आदित्य सहभागी झालेत. यामध्ये 'बेगामी शादी मे अब्दुला दिवाना' या दोघांचा काठीचा संबंध नाही. यामध्ये मला पडायचं नाही, असे शेलार यांनी म्हटले आहे.