Jitendra Awhad : मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे, असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. (Maharashtra Politics) त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार (Maharashtra Political News) चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, आपल्याविरोधात 72 तासांत दोन खोटे गुन्हे (Crime News) दाखल केल्याने आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे आव्हाड यांनी म्हटलं आहे. (अधिक वाचा - आमदार जितेंद्र आव्हाड अडचणीत, महिलेने केला गंभीर आरोप)
ठाण्यातील वर्तक पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचा गुन्हा आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. आता मुंब्रा येथे त्यांच्याविरोधात महिलेच्या आरोपानंतर विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. आपल्याविरोधात 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केल्याने आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करताना म्हटले आहे. आपण पोलिसी अत्याचाराविरोधात लढणार असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमधून म्हटले आहे.
भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा आरोप (Woman Molestation Case) आव्हाड यांच्यावर केला आहे. त्यामुळे आव्हाड हे वादात सापडले आहेत. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आव्हाड हे व्यथित झाले आहेत. त्यांनी ट्विट करताना म्हटले आहे, आपल्याविरोधात पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत.
विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर जितेंद्र आव्हाड कमालीचे संतापलेत. या पोलिसी अत्याचाराविरोधात आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी ट्वीटद्वारे म्हटलंय. 72 तासांत आपल्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल झालेत. त्यामुळे पोलिसी अत्याचाराविरोधात लढणार असल्याचं आव्हाड म्हणाले. मी पोलिसांच्या अत्याचाराविरोधात लढणार आहे. त्यामुळे मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे, असे त्यांनी ट्विटमधून सूचीत केले आहे.