Ashish Shelar : मुंबईतील प्रदूषण ठाकरे सरकारच्या कारभारामुळं, आशिष शेलार यांचा आरोप
Political News in Marathi : ठाकरे सरकारमुळे (Thackeray Govt) मुंबईतील प्रदूषण (Pollution in Mumbai) एकाचवेळी भयंकर टप्प्यावर पोहोचलं आहे असा आरोप आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलाय. (Political News in Marathi) शेलारांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नियम कडक करण्याची मागणी केलीय.
Latest Political News in Marathi : ठाकरे सरकारने (Thackeray Govt) बिल्डरांवर सवलतींची खैरात केल्यामुळे मुंबईत ( Mumbai News) एकाच वेळी मोठ्या प्रमाणात बांधकामं सुरू झाली. त्यामुळे मुंबईतील प्रदूषण (Pollution in Mumbai) एकाचवेळी भयंकर टप्प्यावर पोहोचलं आहे असा आरोप आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलाय. (Political News in Marathi) शेलारांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नियम कडक करण्याची मागणी केलीय. मुंबईतलं ५० टक्के प्रदूषण हे बांधकामामुळे होत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय असं त्यांनी पत्रात म्हटलंय. अनेक वर्षे प्रलंबित बांधकामं, डेब्रिज व्यवस्थापन याबाबत कडक नियम तयार करण्याची मागणी त्यांनी केलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी असले, तरी राज्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय भाजपला मते मिळू शकत नाहीत, हे मोदी यांनाही मान्य करावे लागले आहे, अशी टीका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केली होती. याला आता भाजकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शेलार म्हणाले, ज्या उध्दव ठाकरे यांनी आयुष्यभर वैचारिक स्वैराचार केला, अशा उद्धव यांना भाजपवर बोलण्याचा अधिकारच नाही. किंबहुना 90 च्या दशकानंतर ज्यांच्या वैचारिक स्वैराचाराचे उदाहरण कु पद्धतीने दिले जाईल, असा राजकीय व्यवहार म्हणजे उद्धव यांचे राजकारण आहे. त्यांनी भाजपला शिकवू नये.
यावेळी शेलार यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. मुंबई महापालिकेच्या ठाकरे यांनी तिजोरीवर दरोडा टाकला, असा गंभीर आरोप भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. भाजप मुंबईला भिकेला लावणार आहे. भक्त आंधळे असतात, हे माहिती होते. पण गुरुसुद्धा आंधळे असतात, हे माहिती नव्हतं. आम्ही बीएमसीला सक्षम बनवले त्यानंतरच फिक्स डिपॉझिट तयार झाले, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होते. त्यावर शेलार यांनी गंभीर आरोप केला.
मुंबई महापालिकेला लाचखोरीचं ग्रहण
दरम्यान, मुंबई महापालिका आशियातली सर्वात श्रीमंत महापालिका समजली जाते. मात्र याच श्रीमंत महापालिकेला लागलं आहे लाचखोरीचं ग्रहण लागले आहे. मुंबई महापालिकेचे लाचखोर कर्मचारी एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थातच एसीबीकडून मुंबई महापालिकेच्या 200 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. 142 प्रकरणांची चौकशी सुरु असून आतापर्यंत 105 प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर मुंबई महापालिकेनं हे स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना काळातल्या आर्थिक घोटाळ्याची ईडीसोबत कॅगकडूनही चौकशी सुरु आहे. आता एसीबीच्या कारवाईमुळे महापालिका अधिकाऱ्यांच्या लाचखोरीचा कारभारच चव्हाट्यावर आला आहे.