भाईंदर : मीरा भाईंदर पालिका निवडणुकीचा निकाल हाती आला. आणि पुन्हा एकदा चित्र स्पष्ट झालं. भाजपचा निर्विवाद विजय मीरा - भाईंदर पालिकेवर झाला आहे. या विचायानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी २ ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आशिष शेलारांनीही शिवसेनेसह विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. मीरा-भाईंदरकरांनी "लबाडाघरचे आमंत्रण" नाकारले. पारदर्शी विकासाची हमी देणाऱ्या भाजपाचा दणदणीत विजय करून स्वीकारले, असं म्हणत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. तसेच या विजयाबद्दल आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचेही अभिनंदन केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपामध्ये यांच्यातील "तू तू मै मै" पाहायला मिळत आहे. 



दुसऱ्या ट्विटमध्ये शेलारांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षरित्या टिका केली आहे. त्यांनी म्हटलं की, काहींच्या ताकदीचा खरा चेहरा समोर आला आहे. मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपाच्या लाटेनं इतर पक्षांचा सुपडा साफ केल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. भाजपानं आतापर्यंत ५४  जागांवर विजय मिळवला असून, मीरा-भाईंदर पालिकेत भाजपा स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. 



तर  शिवसेना 17, काँग्रेस 10 आणि इतरांना 2 जागांवर विजय मिळवणं शक्य होणार आहे.  मीरा- भाईंदर महापालिकेच्या 94 जागांपैकी 83 जागांचे निकाल हाती आले आहेत.  मात्र हाती आलेल्या आकड्यांनुसार पुन्हा एकदा भाजपाच मीरा-भाईंदरमध्ये पालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. मोदी लाट इथेही कायम राहिली आहे.