नवी मुंबई : पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.


कुरुंदकरचा फ्रीज केला सील


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबई पोलिसांनी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरच्या भाईंदरमधल्या घरी जाऊन त्याचा फ्रीज सील केला. अश्विनी बिद्रेच्या हत्येनंतर तिच्या शरीराचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. या फ्रीजमध्ये काही केसही सापडले असून, ते केमिकल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.


आरोपींचा भांडाफोड 


११ आणि १२ एप्रिलच्या रात्री अश्विनी बिद्रेच्या मृतदेहाचे तुकडे वसईच्या खाडीत टाकण्यात आले होते... तर १२ आणि १३ एप्रिल दरम्यान अभय कुरुंदकर, महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी या तिघांचं मोबाईल लोकेशन एकाच ठिकाणी असल्याचं न्यायालयात सांगण्यात आलं.


नौदलाची घेणार मदत


दरम्यान, अश्विनी बिद्रेचा मृतदेह शोधण्यासाठी नौदलाची मदत घेतली जाणार आहे. सोमवारी ही शोध मोहीम घेतली जाणार आहे. अश्विनी बिद्रेचा खून झाला असल्याची कबुली पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याचा अटकेत असलेला खासगी चालक कुंदन भांडारी आणि त्याचा मित्र महेश फणीकर यांनी गुरुवारी न्यायालयात दिली. या दोघांनाही अनुक्रमे ५ आणि ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. 


मात्र या घटनेला बराच काळ लोटल्यानं तपासातले पुरावे नष्ट होण्याची भीती, अश्विनी बिद्रेंचे पती राजू गोरे यांनी बोलून दाखवली आहे.