मुंबई : विधानसभा निवडणुकीची मुंबईसह महाराष्ट्रात जोरदार धूम सुरू झाली. सगळीकडे पक्षांकडून जोरदार प्रचारसभा होत आहे. मतदारांना आपण केलेल्या कामांची आठवण करून देण्यासाठी उमेदवार मतदार राजाकडे जात आहे. विधानसभा निवडणुकांवर प्रत्येक मतदाराचं आपलं असं एक मत आहे. याचप्रमाणे ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनी रुपेरी पडद्यावर अनेक राजकारण्यांची भूमिका रंगवली. या अभिनेत्याला विधानसभा निवडणुकींवर आपलं मत सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशोक सराफ यांना निवडणुकीबद्दल काय वाटत? 


मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. कुणाला निवडावं, कुणाला निवडू नये हा पूर्ण अधिकार तुमचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बाजवला पाहिजे. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत आहे. त्यामुळे दुसऱ्या फळीतील नागरिक मतदान करणं टाळतात. यामुळे मतदानाचा आकडा कमी होतो. तो त्यांचा विचार आहे. पण प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे, असं अशोक सराफ यांना वाटतं.


अशोक सराफ यांनी अनेक मराठी सिनेमांमध्ये राजकारणी व्यक्तीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे या भूमिका साकारताना त्यांनी कुणाला आदर्श मानलं होतं का? असा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की, निळू भाऊंनी इतक्या भूमिका साकारल्या आहेत की, त्याच आमच्यासाठी वेगळ्या होत्या. अशा वेगवेगळे राजकारणी त्यांनी आमच्यासमोर उभे केले आहेत.