मुंबई : भाजपाचं बहुप्रतिक्षित संकल्पपत्र आज प्रसिद्ध करण्यात आलं. या संकल्पपत्राच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. त्यासाठी महत्त्वाकांक्षी नदी जोड प्रकल्प पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत एक कोटी रोजगार निर्मिती करण्याचंही आश्वासन या संकल्पपत्रात देण्यात आलंय. विशेष म्हणजे या संकल्पपत्रात महात्मा फुले आणि सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आलीय. तसंच बाबासाहेब आंबेडकरांचं इंदूमिलमधील स्मारक २०२० मध्ये पूर्ण करणार असल्याचंही संकल्पपत्रात नमूद करण्यात आलंय.


दलित, ओबीसी नेत्यांचा भाजपाला पाठिंबा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अर्जुन डांगळे, लेखिका मल्लिका अमरशेख ढसाळ, धनगर समाजाचे नेते रामराव वडकुते, दिलीपदादा जगताप, सुभाष पांचाळ आदी दलित व ओबीसी चळवळीतील प्रमुख नेत्यांनी मंगळवारी मुंबईत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना भेटून भाजपाला पाठिंबा जाहीर केलाय. यावेळी, विधानसभा निवडणुकीत भाजपालाच विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



भाजपाचे संकल्प पत्र मंगळवारी मुंबईत प्रकाशित झाल्यानंतर या नेत्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. रामराव वडकुते यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे दिलीपदादा जगताप आणि दिनेश गोडघाटे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – खोरिपचे हरिदास टेंभुर्णे, मेघवाल समाज संघटनेचे प्रेमजी गोहिल, कक्कया समाज संघटनेचे मनोहर कटके, मल्हार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रामदासजी कोळेकर, हरिदास टेंबुर्णे, विनोद ओरसे, ओबीसी विश्वकर्मीय बलुतेदार महासंघ महाराष्ट्रचे अध्यक्ष सुभाष पांचाळ यांनी भाजपाला पाठिंबा दिला. तसेच धनगर समाज सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळू आराप्पा धनगर, सचिव मलम्मा धनगर, खजिनदार रमेश धनगर आणि महिला कामगार संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष भारती राठोड यांनी भाजपाला पाठिंबा दिला