मुंबई : ३७० हा भावनिक नव्हे तर राष्ट्रीय मुद्दा आहे. त्यामुळे देशभक्तीवर का बोलू नये ? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. 'झी २४ तास' ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत आहेत. देशाची जनता मोदींसोबत असून पुन्हा सरकार येण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे नॉन ईश्यू आहेत त्यांच्यावर संजय राऊत भाष्य करतात यासाठी तुम्ही त्यांचे धन्यवाद दिले पाहीजेत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. आदित्य हे सक्रीय आहेत. ते महाराष्ट्रात विविध भागात जात आहेत. समस्या समजून घेत आहेत. आपण त्यांच स्वागत केलं पाहीजे. त्यांनी कोणत्या पदावर जायच याचा निर्णय त्यांच्या पक्षाने घ्यायचा आहे. आदित्य यांना मंत्रीमंडळात घ्यायचे का ? हा निर्णय त्यांचा पक्ष घेईल. पण ते जर आले तर मला आनंदच आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 


युती म्हटलं की तडजोड आलीच असे म्हणत त्यांनी युतीवरही भाष्य केले. वेगवेगळे जाहीरनामे आहेत असे का ? या प्रश्नाला उत्तर देताना आम्ही वेगळे पक्ष आहोत म्हणून हे पूर्वापार सुरु आहे. पण काही गोष्टींवर आमचे मुद्दे एक आहेत. आणि आम्हाला एकत्रच पूर्ण करायचे आहेत असेही ते म्हणाले.


अनेक प्रकारची लोक पक्षात येतात. प्रत्येकाला तात्काळ निवडून यायचं असतं. त्यातून बंडखोरी होते. बंडखोरांना कोणीही मतदान करणार नाही.


नारायण राणे हे भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांना नव्याने प्रवेश देण्याची गरज काय ? 


शिवसेनेने जाहीरनामा दिला आहे तर विचार करुनच दिला असेल. मी त्यांच्याशी चर्चा करेन. कारण घोषणा पूर्ण करताना पाठबळ द्याव लागत याची जाणीव त्यांना देखील आहे. 


निवडून येणाऱ्या सत्ताधारी पक्षाचा आमचा जाहीरनामा आहे. 


चंद्रावर प्लॉट देतो आणि ताज हॉटेल बांधून देतो या दोन गोष्टी विरोधकांच्या जाहीरनाम्यात राहील्या आहेत असा टोला मुख्यमंत्र्यांनी केला. 


नाणारच्या संदर्भात आम्ही निर्णय घेतलाय. रिफायनरीसाठी आम्ही योग्य जागा शोधतोय. रिफायनरी होणार आणि महाराष्ट्रातच होणार आणि पुढच्या पाच वर्षात होणार.