अखेर महायुतीची घोषणा, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले जाहीर
महायुतीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे.
मुंबई : शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची अखेर संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. मात्र ही घोषणा करताना जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. महायुतीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे महायुतीची आज रात्री १२ वाजेपर्यंत कधीही घोषणा होणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्यानंतर काही वेळातच संयुक्त पत्रकाद्वारे शिवसेना-भाजप महायुतीची घोषणा झाली आहे. चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई यांच्या स्वाक्षरीने पत्रक प्रसिद्ध, करण्यात आले आहे. मात्र, जागावाटपाबाबत काहीही भाष्य करण्यात आलेले नाही.
भाजप, शिवसेना, रिपाई, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती यांचा महायुतीचा निर्णय झाला आहे. तसे प्रसिद्ध पत्रक भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सहीने जाहीर करण्यात आले आहे. तसेच या महायुतीत कोणता पक्ष कोणती आणि किती जागा लढविणार आदी तपशील लवकरच जाहीर केला जाईल. ही महायुती महाराष्ट्रामध्ये राज्यातील जनतेचा अभूतपूर्व आशीर्वाद प्राप्त करेल, असा विश्वास यात व्यक्त करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संयुक्तपणे युतीची घोषणा करतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे युती होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र, आता शिवसेना - भाजपचे संयुक्त पत्रक प्रसिद्धीला देण्यात आले. युतीचे ठरले असले असून युतीची जाहीर घोषणा करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे केले. युती होणार की नाही याचीच उत्सुकता शिगेला होती. मात्र, अखेर भाजप- शिवसेनेचे संयुक्त पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युतीचे संकेत दिले होते. याची घोषणा लवकरच होईल, असे स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युतीबाबत संयुक्तपणे सांगतील, असे स्पष्टे केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी महायुतीची घोषणा नागपूर येथे केली.
भाजप - शिवसेनेचे संयुक्त प्रसिद्ध पत्रक