मुंबई : विधानसभा निवडणूकीचा जोरदार प्रचार महाराष्ट्रात सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा तडाखा लावला आहे. सेलिब्रिटी उमेदवार घेऊन कोणत्या पक्षांनी मतदारांना आकर्षित केलं आहे. तर काही उमेदवारांच्या प्रचाराकरता चक्क सेलिब्रिटी मैदानात उतरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेकडून आतापर्यंत कुणीही निवडणूक लढवली नव्हती. पहिल्यांदा आदित्य ठाकरे मुंबईच्या वरळीतून उमेदवारी लढवत आहेत. असं असताना आता आदित्य ठाकरेंच्या समर्थनाकरता अभिनेता संजय दत्त समोर आला आहे. अभिनेता संजय दत्तने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत



या व्हिडिओ बोलताना संजय दत्तने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली आहे. 'बाळासाहेब ठाकरेंनी मला आणि माझ्या कुटुंबाला खूप सपोर्ट केला आहे. बाळासाहेब मला माझ्या वडिलांप्रमाणे होते. हे मी कधीच विसरू शकत नाही', असं संजय दत्त या व्हिडिओत म्हणाला. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास संजय दत्तने व्यक्त केला आहे. 'बाळासाहेब ठाकरे हे मला वडिलांसमान होते, ते माझ्या आयुष्यात पाठिशी राहिल्याची भावनाही संजूबाबाने व्यक्त केली आहे. आदित्य मला लहान भावासारखा आहे', असं देखील संजय दत्त म्हणाला. 


कामाबद्दल बोलायचं झालं तर संजय दत्त निर्मात्याच्या रुपात आता दिसणार आहेत. 'प्रस्थानम' हा पहिला सिनेमा प्रदर्शित केला आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत संजय दत्त दिसले आहेत. तर अर्जून कपूर आणि इतर स्टारकास्टसोबत 'पानीपत' या आगामी सिनेमात संजय दत्त दिसणार आहे.