सलमानचा `शेरा` बनला शिवसेनेचा `वाघ`
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश
मुंबई : ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. आदित्य ठाकरे मुंबईच्या वरळी मतदार संघातून उभे राहिले आहेत. असं असताना त्यांना बॉलिवूडच्या अनेक कलाकारांकडून विधानसभा निवडणुकीला पाठिंबा मिळत आहे.
आतापर्यंत अभिनेता संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती, सुनील शेट्टी, डिनो मोरिया आणि धर्मेशकडून पाठिंबा मिळाला आहे. व्हिडिओ करून त्यांनी आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. असं असताना शुक्रवारी सलमान खानचा बॉडीगार्ड 'शेरा' याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. शेराने मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेकडून ट्विटरवर याची माहिती देण्यात आली. शेराच्या खांद्यावर भगवा झेंडा आणि हातात तलवार देऊन शिवसेनेत प्रवेश केला. आता शेराने शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे खूप महत्वाची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर घेतली आहे.
गेल्या 20 वर्षांपासून शेरा सलमान खानचा 'बॉडीगार्ड' म्हणून कार्यरत आहे. शेरा आज सलमान खानच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच आहे. शेराचं खरं नाव गुरमीत सिंह जॉली असं आहे.
जाणून घेऊया शेरा यांच्याविषयी
सिक्युरिटी क्षेत्राशी जोडले गेलेला शेरा वर्षाचे 2 करोड रुपये आकारतो. म्हणजे महिन्याला 16 लाख रुपये आकारतात.
शिख कुटुंबातील शेराला लहानपणापासूनच बॉडी बिल्डिंगची आवड होती. याच कारणामुळे 1987 मध्ये जूनिअर मिस्टर मुंबई आणि पुढच्यावर्षी म्हणजे 1988 मध्ये मिस्टर महाराष्ट्र बनला.
शेराचे वडिल मुंबईत गॅरेज चालवत होते. गुरमीतला त्याचे वडिल शेरा नावाने हाक मारत असतं. सुरूवातीला शेरा हॉलिवूडच्या सिनेमाचं भारतात शुटिंग असायचं तेव्हा बॉडीगार्डचं काम करायचा. 1995 मध्ये सोहेल खानने सलमान खानच्या विदेशी दौऱ्याकरता शेराच्या कंपनीची सर्विस मागितली. तेव्हा सोहेलने शेराला,'भाईसोबत (सलमान खान) कायम राहणार का?'