मुंबई : जो कर्माने मरणार आहे, त्याला धर्माने मारू नका. आपल्याशी जसे वागलं तेच त्यांच्या पदरी आलंय, आपण कुणाचं वाईट चिंतले नाही असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. रंगशारदा येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या ईडी भेटीबद्दल उद्धव यांनी यावेळी भाष्य केले. हा महाराष्ट्र सुडाने कधी वागला नाही. जो सुडाने वागतो त्याला सोडत नाही. आम्ही कधी वागणार नाही. कालसारखा क्षण शिवसेनेतही आला हाेता. बाळासाहेबांना अटक करण्यावेळी असाच क्षण आला होता पण तेव्हा ओढूनताणून असं केलं नव्हतं असा टोला त्यांनी यावेळी लगावला. बाळासाहेबही कोर्टात स्वत: हजर झाले होते. तेव्हा कुणी सांगितले नव्हते की, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय असेही ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२८८ मतदारसंघातील इच्छुकांना इथं बोलवलंय. म्हणजे युती होणार नाही असं नाही. न्यायहक्कासाठी लढल्यावरच लोक सत्ता देतात. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत दिले आहेत. 



महत्त्वाचे मुद्दे 


-शिवसेना प्रमुखांना शेवटच्या काळात वचन दिलंय, की शिवसेनेचा मुख्यमंत्री मी बनवणार'. हे वचन मी पूर्ण करणारच.
- शेतक-यांना कर्जमुक्त नव्हे तर चिंतामुक्त करणाराय, त्यासाठी सत्ता हवंय
- शिवसेना प्रमुखांना शेवटच्या काळात वचन दिलंय, की शिवसेनेचा मुख्यमंत्री मी बनवणार'. हे वचन मी पूर्ण करणारच.
उद्धव ठाकरे
- आम्ही सगळं हे भोगलेलं आहे. तुमच्या बुडाला सत्तेची खुर्ची चिकटली हाेती
- यावेळी मला सत्ता हवीय
- कोल्हापुरच्या पुरात मला जाता आले नाही, पण शिवसैनिकांनी तिथं खूप काम केले
- माझ्या मनात कुणाचं वाईट करायचं नाहीय, 
- काल घडलेले आपण बघितलं.
- मला त्यांच्या कुटुंबात नाही रस
उद्धव ठाकरे
- राजकीयपेक्षा कौटुंबिक भाषण करणाराय
- माझा पक्षच पितृपक्ष आहे
- पुर्वजांचे आशिर्वाद घेवूनच मी पुढं जाताय
- भुतं नमतील पण शिवसैनिक नमणार नाहीत
- शेतक-यांना कर्जमुक्त नव्हे तर चिंतामुक्त करणाराय, त्यासाठी सत्ता हवंय