शरद पवारांनी एका दगडात मारले १० पक्षी
महाराष्ट्राच्या राजकारणातील जानता राजा, अशी ओळख असलेले शरद पवार.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील जानता राजा, अशी ओळख असलेले शरद पवार. तसेच शरद पवारांना तेल लावलेला मल्ल का म्हणतात, ते महाराष्ट्राला आज पुन्हा एकदा कळलं असेल. हा मल्ल कुणाच्या हाती येत नाही आणि बाजी पलटवतो. ईडीची काडी करत पवारांनी कसे मारले एका दगडात १० पक्षी.
शरद पवारांवर महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळ्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे पवारांनी आधी जाहीर केले होते एडीच्या कार्यालयात जाणार आणि त्यांचा पाहुणचांर घेणार म्हणून. मात्र, पवार यांनी आपला निर्णय रद्द केला. पवार जे बोलतात, ते करत नाहीत आणि जे करतात, ते बोलत नाहीत. ईडीत जायचे असे ठरवून न जाणाऱ्या पवारांनी हे करताना एका दगडात १० पक्षी मारलेत.
१. गेम ईडीवरच उलटवला
पवारांनी वातावरण इतकं तापवलं की ईडीनं गुन्हा दाखल करुनही तुम्ही तूर्तास येण्याची गरज नाही, हे ईडीकडूनच वदवून घेतलं...
२. पोलीस आयुक्त पवारांच्या दारी
सहपोलीस आयुक्त विनय चौबेंनी पवारांची भेट घेऊन ईडी कार्यालयात न जाण्याची विनंती केली... पण थेट पोलीस आयुक्त संजय बर्वेंना सिल्व्हर ओकवर यायला पवारांनी भाग पाडलं
३. राजकीय हेतूनं प्रेरित
या कारवाईचा राजकीय हेतूनं प्रेरित असा उल्लेख करत पवारांनी समर्थरांना आणि विरोधकांनाही जो मेसेज द्यायचा तो दिलाय.
४. मरगळ झटकली
ईडी कार्यालयात जाणार म्हणून खळबळ उडवून देऊन राष्ट्रवादीत आलेली मरगळ झटकून टाकली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले
५. डॅमेज करुन दाखवले
ईडीने दाखल केलेला गुन्हा, ईडीत जाण्याची घोषणा, राज्यभर निषेध आणि आंदोलनं, राष्ट्रवादीला मिळालेली सहानुभूती अवघ्या अडीच दिवसांत राज्यात जे डॅमेज करायचं ते केलं आणि मेसेज द्यायचा तो दिला
६. अजित पवार गायब, रोहित सोबत
या सगळ्या पिक्चरमध्ये अजित पवार कुठेच नव्हते... महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या बरखास्त संचालक मंडळातले एकमेव मंत्री अजित पवारांना या अडीच दिवसांत पवारांनी जाणीवपूर्वक दूर ठेवलं अजित पवारांना दूर ठेवलेलं असताना नातू रोहित पवार मात्र आजोबांबरोबर दिसले.... आजोबांसाठी बोलले
७. पवारांशिवाय पर्याय नाही
इतके दिवस लांब राहिलेल्या काँग्रेसला दखल घ्यायला भाग पाडले. राहुल गांधींना पवारांच्या समर्थनार्थ ट्विट करायला लागले आहे. राहुल गांधींनी केल्यामुळे अशोक चव्हाणांनाही ट्विट करावं लागलं. भाजपा विरोधी गटाला पवारांशिवाय पर्याय नाही, हे पुन्हा समोर आलं.
८. शिवसेनेचे आभार
भाजपाचा मित्रपक्ष आणि सत्तेत असलेल्या शिवसेनेचं नाव घेऊन आभार मानत शरद पवारांनी भाजपाला योग्य तो संदेश दिला
९. जाणता राजा
ईडीचं उत्तरकार्य आटोपून पवार रवाना झाले ते थेट पुणे आणि बारामतीच्या पूरपरिस्थितीची पाहणी करायला. सत्ताधारी जागावाटपात मग्न असताना पवार पोहोचलेही
१०. अँग्री ओल्ड मॅन मैदानात
संकटातली संधी शोधत फक्त अडीच दिवसांत शरद पवारांनी एकहाती बाजी पलटवली. दिलेला चेकमेट उलटवून ८० वर्षांचा हा अँग्री ओल्ड मॅन पुन्हा लढायला सज्ज झाला आहे. विधानसभेची लढाई फडणवीस विरुद्ध पवार. मेसेज इज लाऊड अँड क्लिअर.