मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी निम्म्या-निम्म्या जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार हुसेन दलवाई यांनी ही माहिती दिली. दरम्यान, ५० ते ६० उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आल्याचे ते म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसची १० सप्टेंबरनंतर यादी जाहीर केली जाईल, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीत निम्मे - निम्मे जागा लढवण्याचा निर्णय झाल्याची माहिती काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी दिली आहे. 


तसेच मतदारसंघांची यादीही तयार झाली असून ती मंजुरीसाठी काँग्रेसच्या केंद्रीय समितीकडे पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आघाडी झाल्यानंतर म्हणजे २००४ नंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस निम्म्या जागा लढवणार आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीसाठी कोणत्या जागा सोडणार याकडे लक्ष लागले आहे.