मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज अटल सागरी सेतू वाहतुकीसाठी बंद; `हे` आहेत पर्यायी मार्ग!
मुंबईतील शिवडी आणि दक्षिण मुंबई मतदारसंघाची मतमोजणी शिवडी बंदर परिसरात होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मंगळवारी अटल सेतूवरील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.
आज संपूर्ण देशभरातील नागरिकांना लोकसभा निवडणूकांच्या निकालांची उत्सुकता लागली आहे. निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच मुंबईतील शिवडी आणि दक्षिण मुंबई मतदारसंघाची मतमोजणी शिवडी बंदर परिसरात होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मंगळवारी अटल सेतूवरील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.
अटल सेतूवर सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत अटल सेतू वाहतूक अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे. या तर हलक्या वाहनांची वाहतूक सुरू असली तरी त्यांना शिवडीमध्ये थांबता येणार नाही. त्यामुळे काहीशा प्रमाणात याचा वाहतूकीवर परिणाम होण्याती शक्यता वर्तवण्यात येतेय.
वडाळा वाहतूक विभागाच्या हद्दीत शिवडी वेअर हाऊस, बंदर रोड, शिवडी पूर्व येथे 31 दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ आणि 30 दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची स्ट्राँग रूम आहे. आज या ठिकाणी मतमोजणी असल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अटल सेतू शिवडीबाहेर जाण्याचा मार्गातून कोणत्याही प्रकारच्या अवजड वाहनांना अटल सेतू दक्षिण वाहिनी याठिकाणहून येण्यास मनाई करण्यात आली आहे.
मुळात या मार्गावर हलकी वाहने येण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र परंतु त्यांना शिवडी एक्झिट या ठिकाणी उतरण्यास मनाई करण्यात आली असून, त्यांना थेट कुलाबा एक्झिट आणि वडाळा एक्झिट इथल्या पर्यायी मार्ग असेल.
पर्यायी मार्ग कसे असणार आहेत?
अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग नवी मुंबई वाशी खाडीपूल मार्गे, तर हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग - कुलाबा बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झिट) आणि वडाळा बाहेर जाण्याचा मार्ग असणार आहे. यावेळी वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही इतर जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहनं त्याचप्रमाणे पोलीस वाहनं, अग्निशमन दलाची वाहनं, अॅम्ब्युलन्स आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाहीत.