Atal Setu Bridge Woman jumps off Story: पावसाळ्यामुळे मुंबईतील समुद्रात भरती होती. 16 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजून 5 मिनिटे झाली असताना अटल सेतूवर थरारक दृश्य पाहायला मिळाले. कॅब ड्रायव्हर संजय यादव याने समुद्रात उडी मारायला गेलेल्या महिलेला जीव वाचवला. शेवटच्या सेकंदाला तिचे केस पकडून धरले. बॅरियर तीक्ष्ण असल्याने संजयच्या हातावर जखमा झाल्या पण पुढचे 16 सेकंद तो तसाच उभा राहिला.तोपर्यंत एका ट्रॅफीक पोलिसाने महिलेचा डावा खांदा पकडून संजयचा थोडा भार कमी केला. आता एका आठवड्याभरात संजय यादव मुंबईसह आपले गाव झारखंडमध्येही हिरो बनलाय. पेपरमधील बातमी मी माझ्या गावच्या परिवाराला पाठवली होती, त्यांना माझ्यावर गर्व असल्याचे संजय सांगतो. मुंबईचा स्पायडर मॅन अशी आता संजयची ओळख झाली आहे. त्या दिवशी नेमके काय घडले? ही कहाणी त्याने आता सांगितली आहे. 


देवांचे फोटो विसर्जन करण्यासाठी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक 57 वर्षाच्या महिलेची राइड संजयला मिळाली.  मुंलूंडमध्ये राहणाऱ्या महिलेला आपल्या देवांचे फोटो विसर्जन करण्यासाठी दक्षिण मुंबईच्या दिशेने असलेल्या समुद्राजवळ जायचे होते. मी संध्याकाळी 5.30 वाजता मुलूंडवरुन त्यांना पिकअप केले. त्यांना अटल सेतूवर जायचे होते. त्या ब्रीजवर कार थांबवता येत नाहीत, कुठेतरी दुसरीकडे जायला हवे, असे मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्या जिद्द करु लागल्या. 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही, असे म्हणाल्या. 


प्रवासादरम्यान संजयसोबत गप्पा 


मुलूंडवरुन ऐरोलीमार्गे अटल सेतू असा प्रवास होता. दरम्यान रस्त्यात दोघांमध्ये छोट्या छोट्या गप्पा सुरु झाल्या. त्यांनी मला माझ्या परिवाराबद्दल विचारले. माझा फोन बीप करु लागला आणि त्यांनी दोन्ही कान बंद केले आणि मला आवाज कमी करायला सांगितले. माझ्या फोनचा आवाज तर फार नव्हता. काय झालं मॅडम? असं मी त्यांना विचारलं. तर मी जास्त आवाज सहन करु शकत नाही, असे त्या म्हणाला. 7 वाजले तसे त्यांनी मला कार तात्काळ थांबवायला सांगितली. कोणी पाहणार नाही, अशा एका कोपऱ्यात कार उभी कर असे त्या म्हणाल्या.  मी शेलघर टोलप्लाझाजवळ कार थांबवली आणि त्यांना लवकर फोटो विसर्जन करुन यायला सांगितले. 


पूलवर चढल्याने संजय घाबरला 


तिच्या बॅगमधील फोटो आणि मुर्त्या ब्रीजच्या वरुन फेकेल असे संजयला वाटले पण त्या बॅरियरच्या वर चढल्या आणि एक एक फोटो टाकू लागल्या. तेव्हा संजयला भीती वाटू लागली. मी कारमधून बाहेर पडलो आणि तुम्ही हे काय करताय? असे विचारले. मी ब्रीजवर थांबून कायदा तोडला होता म्हणून घाबरलो होतो तर महिला बॅरिगेटवर चढून जोखीम घेत होती. महिलेने 2 फोटो समुद्रात टाकले आणि इकडे तिकडे पाहू लागली. संजयचे लक्ष भटकवण्यासाठी तिने फोटोवर शिंपडण्यासाठी मागितले. लवकर करा, असे मी त्यांना सांगितले पण तरीही त्या ऐकत नव्हता. 


क्षणार्थात उडी 


मागच्या सीटवर ठेवलेली पाण्याची बॉटल रिकामी होती. इतक्यात ट्रॅफीक पेट्रोल व्हॅन वेगाने माझ्याजवळ येताना मी पाहीले. गाडीचा सायरन वाजू जोरजोरात वाजत होता. आम्ही दोघांनी सायरनचा आवाज ऐकला आणि घाबरलो. मी जसे तिच्यावरुन नजर हटवून व्हॅनकडे पाहायला गेलो तसे तिने आपले एक पाय बाहेर काढला आणि तिथून उडी मारली पण मी हाथ पुढे केला आणि तिचे केस पकडले. 


पोलीस वेळेत पोहोचले 


पोलिसांचे युनिट वेळेत पोहोचले. कॉन्स्टेबल ललित अमरशेत, किरण म्हात्रे आणि यश सोनावणे यांनी तात्काळ गाडी थांबवली. महिलेने वळून उडी मारली तसे पोलीस रेलिंगवर चढले. त्यांनी तिला पकडले. तिला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी 1 मिनिटांपेक्षा जास्त काळ लोटला. ते महिलेला नवी मुंबईतील उलवे पोलीस स्थानकात घेऊन गेले आणि तिच्या परिवाराला बोलावले. मला उडी मारायची नव्हती, फक्त फोटो विसर्जित करायचे होते, असे तिने पोलिसांना सांगितले पण पोलीस व्हॅन पाहून मी घाबरली आणि उडी मारली, असा जबाब तिने नोंदवला. महिलेल्या परिवाराने संजयचे आभार मानले. 


जखमी हात घेऊन परतला 


संजय जखमी हात घेऊन घरी परतला. माझे हात हीच माझी रोजीरोटी आहे. पण मी त्यावेळी हा विचार केला नाही. महिलेचा जीव वाचवणे माझ्यासाठी महत्वाचे होते. मी काही असाधारण केले नाही. जीवन अनमोल आहे ते असेच सोडू नये, असे संजय सांगतो. मी चांगली कमाई करु शकलो तर माझ्या परिवारालादेखील येथे आणने पण सध्या मला दुसऱ्यांसोबत रुम शेअर करावा लागतोय. आम्ही चौघे एका खोलीत राहतो. तरीदेखील भाडे खूप आहे. अशावेळी मी माझ्या परिवाराला येथे आणण्याचा विचार कसा करु शकतो? असे संजय म्हणतो.