मुंबई : बोगस पासपोर्टप्रकरणी एटीएसने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ८ जणांना एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपींमध्ये बांगलादेशी नागरिकांचा ही समावेश आहे. वडाळा, मुंब्रा भागात एटीएसने ही कारवाई केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र एटीएसनं बोगस पासपोर्टप्रकरणी एकूण आठ जणांना अटक केली आहे. हे आरोपी बोगस पासपोर्ट आणि कागदपत्रं बनवून बांगलादेशी नागरिकांना महाराष्ट्रात आश्रय देत होते. एटीएसनं मुंबईतल्या वडाळा आणि ठाण्यातल्या मुंब्रा परिसरात कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतलं आहे.


बांगलादेशी घुसखोरांना बनावट भारतीय ओळखपत्रे बनवून दिली जात असल्याचा हा धक्कादायक प्रकार एटीएसने समोर आणला. आरोपीबाबत माहिती मिळाल्यानंतर एटीएसने सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपी देखील घुसखोर होता. त्याने अनेकांना अशा प्रकारे बनावट पासपोर्ट बनवून दिल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. 


ATS ने माहिती मिळताच धडक कारवाई करत आतापर्यंत या 8 आरोपींना अटक केली आहे. बांगलादेशी घुसखोरांना भारतीय ओळखपत्र बनवून देणारं हे रॅकेट या निमित्ताने पुढे आलं आहे. यामध्ये आणखी किती जण सहभागी आहेत. हे पुढे येणं महत्त्वाचं आहे.