Abhishek Ghosalkar: शिवसेना ठाकरे गटाचे दहीसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार (Firing) झाल्याची घटना समोर आली आहे. मुख्य म्हणजे हा गोळीबारीचा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. अभिषेक घोसाळकर मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीबरोबर फेसबूक लाईव्ह करत होते. फेसबूक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. गोळीबाराचा हा थरार फेसबूक लाईव्हमध्ये कैद झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर मॉरिसने स्वत:वरही गोळीबार करत आत्महत्या केल्याची माहिती आहे. पैशांच्या वादातून हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. फेसबुक लाईव्ह करत अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांनी लोकांशी संवाद साधला. अभिषेक घोसाळकर लाईव्ह संवाद साधत असताना मॉरिस तिथून उटला आणि त्याने अभिषेक घोसाळकरवर सहा गोळ्या झाडल्या. अभिषेक घोसाळकर यांच्या पोटात गोळ्या लागल्या.



या व्हिडीओमध्ये काय म्हणतायत मॉरिस भाई?


या व्हिडिओत मॉरिसभाईही फेसबुक लाईव्हमधून संवाद साधताना दिसत आहे. या तो म्हणतोय. आपण एकत्र येऊन चांगलं काम केलं पाहिजे, यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, आण्ही साडी, रेशन वाटप करण्याचं ठरवलं आहे. याशिवाय अभिषेकभाई आणि मी नाशिक ट्रिपसाठी बसेस आयोजित करणार आहोत, असं मॉरिसभाई म्हणतोय.


अभिषेक घोसाळकर काय म्हणाले?


फेसबूक लाईव्हमध्ये अभिषेक घोसाळकर मुंबई ते नाशिकआणि नाशिक ते मुंबई बसेस सोडण्याविषयी सांगत होते. तसंच सर्वांनी एकत्र काम करुयात असंही म्हणताना दिसातयत. आयसी कॉलनी, गणपत नगर, कांदळपाडा परिसरात चांगलं काम करायचं आहे. ही सुरुवात आहे, पुढे अजून काम करायचं आहे असंही अभिषेक घोसाळकर म्हणताना दिसतायत. आपलं भाषण संपवून ते तिथू उठले तितक्यात त्यांच्यावर मॉरीसने गोळीबार केला. विनोद घोसाळकर यांना तातडीने जवळच्या करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


या व्हिडीओमध्ये 5 गोळ्या झाडल्याचा आवाज येतोय. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक घोसाळकर यांना दोन ते तीन गोळ्या लागल्याचं सांगितलं जातंय. शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचा अभिषेक हे पूत्र आहेत.