मुंबई : मराठा आरक्षणाला कोर्टात आव्हान देणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टाबाहेर मारहाण झाली आहे. विधीमंडळात मराठा आरक्षणाचं विधेयक पास झाल्यानंतर सदावर्ते गुणरत्न यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. आज याच याचिकेवर सुनावणी होती. यासाठी ते कोर्टात हजर होते. पत्रकारांशी बोलत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. एक मराठा लाख मराठाची घोषणा देत वैजनाथ पाटील या युवकाने त्यांच्यावर हल्ला केला. वैजनाथ हा जालन्याचा राहणारा आहे. अशी माहिती त्याने दिली आहे. पोलिसांनी वैजनाथ पाटील याला ताब्यात घेतलं आहे.


आज या याचिकेवर सुनावणी होती. मराठा आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिलेली नाही. राज्य सरकारच्या मेगा भरतीलाही स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. भरतीला स्थगिती दिल्यास इतरांचेही नुकसान होईल असं यावेळी कोर्टाने म्हटलं आहे. वैद्यकीय भरतीलाही स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी १९ डिसेंबरला होणार आहे.