Sandeep Deshpande Attack : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्या जवळचे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांच्यावर जीवघेणा हल्ला दादर येथे झाल्याची धक्कादायक समोर आली आहे. (Attack on MNS leader Sandeep Deshpande ) त्यांना तात्काळ हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. देशपांडे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. दादर येथील शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेलेले असताना अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. (Attack on  Sandeep Deshpande Maharashtra Politics News)


देशपांडे यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला वृत्त समजात काही कार्यकर्त्यांनी हिंदूजा रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. सध्या देशपांडे यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज सकाळी ते दादर शिवाजी पार्क येथे ते मॉर्निग वॉक करत होते. यादरम्यान देशपांडे यांच्यावर अज्ञांनी हल्ला केला आहे.संदीप देशपांडे यांच्यावर चार अज्ञात लोकांनी पाठिमागून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांच्या सहकार्याकडून देण्यात आली. ते मॉर्निग वॉकला गेले असता त्यांच्यावर चार लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडे जखमी झालेत. त्यांना तात्काळ हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.


मनसेच्या एका नेत्याने सांगितले की, त्यांच्या डोक्यावर जोरदार हल्ला करण्यात आला होता. मात्र, संदीप देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केल्याने ते थोड्यात बचावले. यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिवाजी पार्क परिसरात असताना त्यांच्यावर हल्ला 4 ते 6 जणांनी केला. हा हल्ला  स्टॅम्पने करण्यात आला आहे. हल्लेखोरांना तोंडाला मास्क लावला होता. त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या ठिकाणी मनसे कार्यकर्ते जमा होत आहेत. त्यामुळे तणावात भर पडत आहे. 


हल्ल्याच्या मनसेकडून निषेध



संदीप देशपांडे यांच्यावर करण्यात आलेला हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी दिली आहे. ज्यांनी कोणी हा हल्ला केला आहे. त्याच्यावर कडक पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. देशपांडे यांनी अनेक प्रकरणावर आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचीही प्रतिक्रीया राजकीय वर्तुळातून उटत आहे.